स्टंट बाईकर्सवर पोलिसांचा गोळीबार, एक जण ठार

संसद भवन जवळ असलेल्या ली मेरिडीयन परिसरात स्टंट करणाऱ्या बाईक्सवाल्यांवर पोलिसांनी गोळीबार केला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 28, 2013, 07:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आज दिल्लीत एका खळबळजनक घटना घडली आहे. संसद भवन जवळ असलेल्या गोलडाक खाना परिसरात स्टंट करणाऱ्या बाईक्सवाल्यांवर पोलिसांनी गोळीबार केला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ही घटना रात्री दोन ते सव्वा दोनच्या आसपास घडली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. नवी दिल्लीच्या गोलडाक खान परिसरातील रस्त्यावर त्यावेळी खतरनाक स्टंट करणाऱ्या बाईक्सवाल्यांना पोलीस विरोध करत असतांना त्या ग्रुपने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिस आधिकाऱ्यांनी सांगितले की, बाईकचा टायर पंक्चर करण्यासाठी झाडलेली गोळी करण पांडे या युवकाच्या पाठीला लागून त्याचा मृत्यू झाला.
आणखी माहिती देतांना पोलीस आधिकारी म्हणाले, गोळी लागून मृत्यू झालेला तरूण हा पुनीत शर्मा याच्या बाईकवर मागे बसलेला होता.या घटनेत पुनीत शर्मा हा तरूण जखमी झाला. दोघांना राम मनोहर लोहिया हाँस्पीटलमध्ये दाखल केले आणि तेथे पांडेय याचा मृत्यू झाल्याचे समजले.तपासणी केल्यानंतर असे उघड झाले की, पुनीत शर्मा दारूच्या नशेत होता. तीस बाईकर्स खतरनाक स्टंट करत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस आधिकारी गोलडाक खाना या ठिकाणी पोहोचले. जेव्हा पोलिसांनी तरुणांना स्टंट करण्यास विरोध केला, तेव्हा त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.
त्या तरूणांनी स्टंट करणं थांबवावं म्हणून पोलिसांनी हवेत गोळीबार केला, तरीदेखील ते तरूण स्टंट करत राहिले. म्हणूनच टायर पंक्चर करण्यासाठी इन्स्पेक्टर रजनीश परमार यांनी गोळी झाडली असता ती गोळी करण पांडे या तरूणाला लागली. या घटनेत काही पोलिस आधिकारीदेखील जखमी झाल्याचे समजते. तर इतर बाईकस्वार पळून गेले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.