जेलमध्ये दहशतवाद्यांकडे मिळाले काजू, बदाम, भांडी आणि शेगडी

सेंट्रल जेलमधून सिमीचे ८ दहशतवादी फरार झाल्याच्या घटनेनंतर जेलमध्ये सर्च ऑपरेशन चालवलं जात आहे. या जेलमध्ये आणखी २१ दहशतवादी आहेत. सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांना अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. यामध्ये काजू, बदाम, किसमिस, खजूर यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. शिवाय जेवन बणवण्याची एक शेगडी आणि काही भांडी पोलिसांना मिळाली आहेत. 

Updated: Nov 2, 2016, 11:06 AM IST
जेलमध्ये दहशतवाद्यांकडे मिळाले काजू, बदाम, भांडी आणि शेगडी title=

भोपाळ : सेंट्रल जेलमधून सिमीचे ८ दहशतवादी फरार झाल्याच्या घटनेनंतर जेलमध्ये सर्च ऑपरेशन चालवलं जात आहे. या जेलमध्ये आणखी २१ दहशतवादी आहेत. सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांना अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. यामध्ये काजू, बदाम, किसमिस, खजूर यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. शिवाय जेवन बणवण्याची एक शेगडी आणि काही भांडी पोलिसांना मिळाली आहेत. 

मटके फोडून देखील त्यामध्ये हे दहशतवादी जेवन शिजवायचे अशी गोष्ट समोर आली आहे. आता पोलीस या गोष्टीची चौकशी करत आहे की, भांडी आणि शेगडी जेलमध्ये पोहोचली कशी ?. जेलमधील पोलिसांवरही संशयाची सूई आहे.

मंगळवारी दहशतवाद्यांनी जेलमधील टीव्ही कनेक्शन देखील कापून ठेवले आहे. जेलमधील बंद सीसीटीवी दुरुस्तीचं काम या घटनेनंतर सुरु झालं आहे.