धक्कादायक भावांनी केली गर्भवती बहिणीची हत्या

 उत्तरप्रदेशातील मेरठ इथं राहणाऱ्या भावांनी त्यांच्या गर्भवती बहिणीचा गऴा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. हस्तीनापूर पोलीस स्टेशनमधील पोलिस अधिकारी पी.के. सिंग यांनी सांगितलं की, मंगळवारी मध्य गंगेत त्यांना एका युवतीचा मृतदेह सापडला. चौकशीतून समोर आलं की हे प्रकरण हॉरर किलिंगचं आहे. 

Updated: Nov 29, 2014, 12:50 PM IST
धक्कादायक भावांनी केली गर्भवती बहिणीची हत्या title=

मेरठ :  उत्तरप्रदेशातील मेरठ इथं राहणाऱ्या भावांनी त्यांच्या गर्भवती बहिणीचा गऴा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. हस्तीनापूर पोलीस स्टेशनमधील पोलिस अधिकारी पी.के. सिंग यांनी सांगितलं की, मंगळवारी मध्य गंगेत त्यांना एका युवतीचा मृतदेह सापडला. चौकशीतून समोर आलं की हे प्रकरण हॉरर किलिंगचं आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की या युवतीचं गावातील एका युवकासोबत प्रेमप्रकरण होतं. तिच्या पोटात दुखत असल्याकारणानं जेव्हा तिचं चेकअप करण्यात आलं, तेव्हा कळलं की ती आठ महिन्यांची गर्भवती आहे.

जेव्हा त्या युवतीनं तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितलं तेव्हा तीचे भाऊ सोनु,भूरे आणि त्यांचा एक मित्र धर्मपाल यांनी प्लॅन करून तिची हत्या केली. त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते तिघं आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेणं सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.