पहिल्याच सभेत प्रियांका गांधींनी मोदींवर डागली तोफ

उत्तर प्रदेशच्या रणसंग्रामात प्रियांका गांधी यांनी आज प्रथमच प्रचारसभा घेतली.

Updated: Feb 17, 2017, 08:57 PM IST
पहिल्याच सभेत प्रियांका गांधींनी मोदींवर डागली तोफ

रायबरेली : उत्तर प्रदेशच्या रणसंग्रामात प्रियांका गांधी यांनी आज प्रथमच प्रचारसभा घेतली. काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीमध्ये प्रियांकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली. आपण उत्तर प्रदेशचे दत्तक पुत्र असल्याचं विधान पंतप्रधानांनी जाहीर सभेत केलं होतं. या वक्तव्यावरून प्रियांका गांधींनी मोदींना लक्ष्य केलं.

उत्तर प्रदेशला स्वत:चे पुत्र असताना दत्तक पुत्राची गरज नसल्याचा टोला प्रियांका गांधींनी लगावला आहे. या राज्यातला प्रत्येक तरुण हा नेता बनू शकतो. आपल्या राज्याचा विकास करण्याची योग्यता इथल्या तरुणांमध्ये आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.