त्यांना मुंबईत बॉम्बस्फोट करायचा होता..

ऑगस्टमध्ये पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाचा छडा लागलाय. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं पुणे बॉम्बस्फोटातल्या तीन संशयितांना अटक केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 11, 2012, 03:45 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
ऑगस्टमध्ये पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाचा छडा लागलाय. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं पुणे बॉम्बस्फोटातल्या तीन संशयितांना अटक केलीय. त्यांना मुंबईत बॉम्बस्फोट करायचा होता, अशी माहिती पुढे आली आहे.
पुणे साखळी बॉम्बस्फोटातील तीन संशयीत दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर वेगळीच माहिती पुढे आली आहे. त्यांना पुण्यात नाही तर मुंबईत स्फोट घडवून आणायचे होते. मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्याचा त्यांचा कट होता. मात्र, प्लॅन बदलून पुण्यात स्फोट घडविले गेलेत, अशी माहिती दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी दिली.
इंडियन मुजाहिद्दीनच्या संघटनेसाठी असद आणि इम्रान खान काम करीत होते. हे दोघे रुडकी शहरातून दिल्लीत आले होते. त्यांना पोलिसांनी अटक केली. असद हा नांदेडच्या दयानंद कॉलेजचा विद्यार्थी आहे.
येरवडा जेलमध्ये सिद्दिकीच्या झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुण्यात बॉम्बस्फोट घडविले असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. शरद मोहोळ आणि भालेराव या गुंडांनी सिद्दिकीची केली होती हत्या.
सय्यद फिरोज, इम्रान आणि असद असं या तिघा दहशतवाद्यांची नावं आहेत. हे तिघं इंडियन मुजाहिदीन या संघटनेचा म्होरक्या यासीन भटकळचे जवळचे असल्याचं पुढं आलंय. या तिघांनी सुरूवातीला मुंबईत बॉम्बस्फोट घ़डवण्याचा कट आखला होता. मात्र अचानक योजनेत बदल करून त्यांनी पुण्यातल्या जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट घडवले.
पुण्यातल्या येरवडा जेलमधील कातील सिद्दीकीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी बॉम्बस्फोट केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. यातला सय्यद फिरोज पुण्यातला आहे. असद आणि इम्रानला २६ सप्टेंबरलाच अटक करण्यात आली होती.
या तिघांच्या अटकेमुळं आता पुणे बॉम्बस्फोटाला तपासाला मोठा वेग आला असून पुणे बॉम्बस्फोटांतली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.