व्हिडिओ: पाहा काँग्रेसचे युवराज लोकसभेत झोपले

लोकसभेत चर्चेदरम्यान खासदारांना झोप अनावर झाल्याचं चित्र आपण अनेकवेळा पाहिलं असेल... पण आज लोकसभेत चक्क राहुल गांधी झोपले.... 

Updated: Jul 9, 2014, 05:58 PM IST
व्हिडिओ: पाहा काँग्रेसचे युवराज लोकसभेत झोपले title=

नवी दिल्ली: लोकसभेत चर्चेदरम्यान खासदारांना झोप अनावर झाल्याचं चित्र आपण अनेकवेळा पाहिलं असेल... पण आज लोकसभेत चक्क राहुल गांधी झोपले.... 

महागाईवर लोकसभेत अतिशय गंभीर चर्चा सुरू होती. त्यावेळी राहुल गांधी यांना चर्चा ऐकताना चक्क झोप लागली. महागाईच्या मुद्द्यावर जनतेचं कंबरडं मोडलंय. विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसनं सरकारला धारेवर धरणं आवश्यक आहे. अशावेळी ज्यांना काँग्रेसचं भविष्य म्हणून लोक पाहात आहेत ते राहुल गांधी मात्र चक्क लोकसभेत झोपले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.