अखेर राहुल गांधींचा पत्ता सापडला, म्यानमारमध्ये विपश्यना सुरू

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी गेले कुठे ? असा प्रश्न राजधानीत चर्चीला जात होता. एकीकडे महत्वाच्या राजकीय घटना घडत असताना राहुल गांधींचं अस्तित्व दिसत नसल्यानं राजकीय वर्तुळातं चर्चेला उत आला होता. 

Updated: Apr 10, 2015, 11:03 AM IST
अखेर राहुल गांधींचा पत्ता सापडला, म्यानमारमध्ये विपश्यना सुरू title=

नवी दिल्ली: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी गेले कुठे ? असा प्रश्न राजधानीत चर्चीला जात होता. एकीकडे महत्वाच्या राजकीय घटना घडत असताना राहुल गांधींचं अस्तित्व दिसत नसल्यानं राजकीय वर्तुळातं चर्चेला उत आला होता. 

मात्र राहुल गांधींचा ठावठिकाणी आता लागलाय. ब्रम्हदेशातील म्यानमारमध्ये राहुल विपश्यना शिबिरात असल्याची माहिती समोर आलीये. आत्मशुद्धीसाठी विपश्यना ध्यान धारणेचा आधार घेतला जातो. 

१४ एप्रिलला राहुल गांधी दिल्लीत परततील अशी शक्यता आहे. १९ एप्रिलला रामलीला मैदानात होणाऱ्या शेतकरी, मजूर रॅलीमध्ये ते सहभागी होणार आहेत.    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.