राहुलभेटीनंतर नारायण राणे बॅकफूटवर

 दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीनंतर काँग्रेस नेते नारायण राणे काहीसे बॅकफूटवर आल्याचं चित्र आहे.  काँग्रेस नेतृत्वानं शब्द न पाळल्याचा आरोप करत राजीनामा देणा-या राणेंनी राहुल यांच्या भेटीबाबत आपण समाधानी असल्याचं म्हटलंय.

Updated: Jul 24, 2014, 07:50 PM IST
राहुलभेटीनंतर नारायण राणे बॅकफूटवर  title=

नवी दिल्ली : दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीनंतर राजीनामा दिलेले उद्योगमंत्री नारायण राणे काहीसे बॅकफूटवर आल्याचं चित्र आहे.  काँग्रेस नेतृत्वानं शब्द न पाळल्याचा आरोप करत राजीनामा देणा-या राणेंनी राहुल यांच्या भेटीबाबत आपण समाधानी असल्याचं म्हटलंय.

आता राहुल गांधी सोनियांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसोबत राणे सोनियांची भेट घेतील. श्रेष्ठी काय निर्णय घेतात, यावर आपली भूमिका ठरेल असं राणेंनी जाहीर केलंय. आपण इथं पदासाठी आलेलो नाही, असं सांगतानाच मोठी जबाबदारी मिळाली तर ती स्वीकारू असंही राणेंनी जाहीर केलंय.

नारायण राणे आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी साडेचार वाजेपासून दोघांमध्ये चर्चा झाली. राज्यातल्या नेत्यांना राणेंचं मनवळवण्यात अपयश आल्यामुळं आता त्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी राहुल गांधींवर आहे. राहुल यांना तरी राणेंची मनधरणी करण्यात यश य़ेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.