राहुल गांधींचं 'येस वुई कॅन...'

आज राहुल गांधी सीसीआयच्या कार्यक्रमात दिलखुलास बोलले. प्रत्येक शब्द नवा होता, प्रत्येक स्टाईल वेगळी होती. कधी दिसले ‘अँग्री यंग मॅन’ राहुल तर कधी राहुल गांधी होते ‘मोटिवेशन गुरू’च्या भूमिकेत.

जयवंत पाटील | Updated: Apr 5, 2013, 09:58 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
आज राहुल गांधी सीसीआयच्या कार्यक्रमात दिलखुलास बोलले. प्रत्येक शब्द नवा होता, प्रत्येक स्टाईल वेगळी होती. कधी दिसले ‘अँग्री यंग मॅन’ राहुल तर कधी राहुल गांधी होते ‘मोटिवेशन गुरू’च्या भूमिकेत. सूटाबूटातल्या उद्योजकांनी खचाखच भरलेल्या सीसीआयच्या पॅव्हेलियनमध्ये वेगळे दिसत होते ते राहुल गांधी. शुभ्र कुर्ता आणि पायजम्यामधल्या राहुल गांधींनी एकदम वेगळ्याच स्टाईलमध्ये बोलायला सुरुवात केली.
अँग्री यंग राहुल
गरिबी, श्रीमंती आणि राजकीय व्यवस्थेवर भाष्य करताना राहुलनी अनेकवेळा चीड व्यक्त केली. आणि उपस्थितांना दिसला राहुल गांधींचा अँग्री यंग लूक
कुल ड्युड राहुल
राहुल गांधी कधी अंग्री यंग मॅन होते तर कधी त्यांची कुल डुड इमेजही तरुणांना आवडून गेली.

राहुलची वॉकिंग स्टाईल
या भाषणात दिसून आली ती राहुलची वेगळी वॉकिंग स्टाईल
प्रोफेसर राहुल
राहुल गांधींनी एखाद्या प्राध्यापकासारखं भाषण केलं. ज्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांनाही बोलतं केलं.

मोटिवेशन गुरू
प्राध्यापकीनंतर एक पाऊल पुढे टाकत राहुल गांधींनी चक्क मोटिवेशनल गुरूचीही भूमिका निभावली.

सीसीआयमध्ये झालेल्या या भाषणात राहुल गांधींची स्टाईल प्रचंड वेगळी होती. या भाषणातून राहुलनी संदेश दिला YES, WE CAN CHANGE चा.... आणि आता तयारी सुरू केलीय देशाला बदलण्याची....आणि अर्थात हा बदल घडवायचाय 2014 साठी.....