ट्विटरवर सूचना मिळाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी उपलब्ध करुन दिले लहान मुलाला दूध

धुक्यामुळे उशिराने धावत असलेल्या रेल्वेमधील बाळाला भूख लागली. मात्र, त्याला दुधाची गरज होती. याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना याबाबत ट्विट करण्यात आले. रेल्वेमंत्र्यांनी याची दखल घेत फतेहपूर जिल्ह्यात दुधाची व्यवस्था केली. तसेच कानपूर येथे रेल्वे पोहोचल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी पाच वर्षांच्या बाळाला दूध आणि बिस्कीट उपलब्ध करुन दिले.

PTI | Updated: Dec 11, 2015, 07:17 PM IST
ट्विटरवर सूचना मिळाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी उपलब्ध करुन दिले लहान मुलाला दूध title=

कानपूर : धुक्यामुळे उशिराने धावत असलेल्या रेल्वेमधील बाळाला भूख लागली. मात्र, त्याला दुधाची गरज होती. याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना याबाबत ट्विट करण्यात आले. रेल्वेमंत्र्यांनी याची दखल घेत फतेहपूर जिल्ह्यात दुधाची व्यवस्था केली. तसेच कानपूर येथे रेल्वे पोहोचल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी पाच वर्षांच्या बाळाला दूध आणि बिस्कीट उपलब्ध करुन दिले.

इलाहाबाद येथे उत्तर मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी अमित मालवीय यांनी याबाबत माहिती दिली. बनारसमध्ये महुआडीह स्टेशनवरून दिल्लीला जाणारी १२५९१ ही सुपर फास्ट एक्सप्रेस उशिराने धावत होती. या गाडीतून देवरिया येथील निवासी कुसुम यादव आपल्या ५ वर्षांच्या मुलासह प्रवास करीत होती. अवीश याला भूक लागली. तो भूकेने व्याकूळ झाला होता. रेल्वेत दूध न मिळाल्याने काय करायचे या विचाराने मुलाच्या वडिलांना ट्विट केले. माझी पत्नी आणि मुलगा रेल्वेतून प्रवास करीत आहेत. मुलाला भूक लागली आहे. दूधही मिळत नाही, अशी चिंता व्यक्त केली. या ट्विटची दखल सुरेश प्रभू यांनी घेतली आणि संबंधितांना आदेश दिलेत.

कानपूर येथे गाडी पोहोचल्यानंतर तात्काळ रेल्वेअधिकाऱ्यांनी दूध, पाणी आणि बिस्किट मुलाला उपलब्ध करुन दिले. याआधी प्रभूनी महाराष्ट्रातील एका महिलेला मदत देऊ केली होती. शेगाव येथून नम्रता महाजन या १८०३० या गाडीतून ने एकट्याच प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान एका पुरुष रेल्वे प्रवाशाने त्यांना त्रास देण्यात सुरुवात केली. त्यांनी तसे ट्विट सुरेश प्रभू यांना केले. याची दखल घेत रेल्वे पोलीस तिच्या मदतीला गेलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.