रेल्वे वापरणार डब्यात सौर उर्जा

 रेवरी-सितापूर पॅसेंजर ट्रेनवर सोलर पॅनल बसवण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याद्वारे सौर उर्जेचा वापर रेल्वेतील वीजेसाठी करण्यात येणार आहे. 

Updated: Jun 23, 2015, 08:57 PM IST
रेल्वे वापरणार डब्यात सौर उर्जा title=

नवी दिल्ली :  रेवरी-सितापूर पॅसेंजर ट्रेनवर सोलर पॅनल बसवण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याद्वारे सौर उर्जेचा वापर रेल्वेतील वीजेसाठी करण्यात येणार आहे. 

येत्या पाच वर्षात या माध्यातून १००० मेगावॅट वीज निर्मिती करण्याचा रेल्वेचा विचार आहे. 

शान-ए-पंजाब एक्स्प्रेस आणि ताज एक्स्प्रेसमध्ये लवकरच सौर पॅनल लावण्यात येणार असल्याची माहिती उत्तर रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रेवरी-सीतापूर पॅसेंजरला सौर पॅनल लावण्यासाठी सुमारे ३ लाख ९० हजार रुपये खर्च आला असून रेल्वे या माध्यमातून १.२४ लाख रुपये प्रत्येक वर्षी वाचविणार आहे. 

सौर उर्जेच्या माध्यमातून १७ युनीट वीज प्रत्येक दिवशी निर्मित होणार असून या माध्यमातून प्रत्येक कोचचे दिवे लागू शकणार आहे. आम्ही सध्या तरी नॉन एसी ट्रेनमध्ये सौर पॅनल लावणार असल्याचेही या आधिकाऱ्याने सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.