गणपतीनिमित्त रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट

गणपती बाप्पांच्या आगमनाला आता अवघे काही तास उरले आहेत. गणेशोत्सवाची लगबग आता सगळीकडे सुरु झाली आहे.

Updated: Sep 4, 2016, 11:41 PM IST
गणपतीनिमित्त रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट  title=

मुंबई : गणपती बाप्पांच्या आगमनाला आता अवघे काही तास उरले आहेत. गणेशोत्सवाची लगबग आता सगळीकडे सुरु झाली आहे. खास गणेशोत्सवासाठी रेल्वेनंही प्रवाशांना गिफ्ट द्यायचा निर्णय घेतला आहे.  

मुंबईहून नवी दिल्लीला सुटणा-या राजधानी एक्स्प्रेस आणि ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमध्ये उद्या प्रवाशांना मोदक सर्व्ह केले जाणार आहेत. आयआरसीटीसीने गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना मोदक देण्याचं जाहीर केलं आहे.