२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिर बनणार - साक्षी महाराज

विवादात्मक वक्तव्य आणि साक्षी महाराज देशाला नवं नाही.

Updated: Jan 9, 2016, 06:34 PM IST
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिर बनणार - साक्षी महाराज title=

नवी दिल्ली : विवादात्मक वक्तव्य आणि साक्षी महाराज देशाला नवं नाही. भाजपचे खासदार साक्षी महाराज देशातील सर्वात विवादात्मक प्रकरणावर विवादात्मक वक्तव्य केलं आहे. 'राम मंदिर हा पक्षाचा अजेंडा आहे आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिर होणारचं.' 

भाजप नेत्याने म्हटलं की 'या विवादात्मक जागेवर सगळ्यांच्या सहयोगाने मंदिर बनू शकतं किंवा मग लोकसभेत विधेयक मंजूर करूनही मंदिर बांधलं जाऊ शकतं.'

आम्ही कुराणचं आदर करतो, त्यामुळे मुस्लिमांनी गीता, रामायण आणि भगवान राम यांचा आदर केला पाहिजे. आम्ही मस्चिदच्या विरोधात नाही, त्यामुळे मंदिर उभारण्यात मुस्लिमांनी सहजता दाखवली पाहिजे. 

विहिपचे नेते सुरेंद्र जैन यांनी संसदेत एक विधेयक मंजूर करण्यासाठी जोर दिला आहे आणि सोनिया गांधी यांनाही याचं समर्थन करण्यासाठी आग्रह केला आहे.