१२ एकरचा आश्रम, BMW, मर्सिडीज कार... पाहा बाबांची माया!

२०१०मध्ये कंपनीमध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीला कामात हयगय करत असल्या कारणानं नोकरीवरून काढलं. आज त्याच व्यक्तीजवळ १०० कोटींची माया आहे आणि जगात त्याला संत रामपाल नावानं ओळखतात.

Updated: Nov 20, 2014, 02:14 PM IST
१२ एकरचा आश्रम, BMW, मर्सिडीज कार... पाहा बाबांची माया! title=

मुंबई: २०१०मध्ये कंपनीमध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीला कामात हयगय करत असल्या कारणानं नोकरीवरून काढलं. आज त्याच व्यक्तीजवळ १०० कोटींची माया आहे आणि जगात त्याला संत रामपाल नावानं ओळखतात.

६२ वर्षीय या बाबाजवळ BMWपासून मर्सिडीज आणि प्रत्येक प्रकारची लक्झरी कार आहे आणि तो हरियाणाचील बरबालामध्ये असलेल्या १२ एकर परिसरात आश्रम थाटून राहतो. बाबाच्या या आश्रमात खास भक्तांसाठी एअर कंडिशनल रूम आहेत आणि लेक्चर देण्यासाठी हॉल, जिथं मोठ-मोठे एलईडी स्क्रीन्स लागल्या आहेत. 

रामपालची आपली वेबसाइटही आहे ज्यावर त्याचे नियम लिहिले गेलेय. या वेबसाइटवर रामपालचं संत्संग लाइव्ह दाखवला जातो. बाबाजवळ आपलं फेसबुक आणि यु-ट्यूब अकाऊंट पण आहे. बाबा रामपाल अटक सत्र सुरू असतांना या फेसबुक पेजचे लाइक्स जवळपास दोन हजार रुपयांनी वाढलेत.   

बाबाचं म्हणणं आहे की, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब आणि दिल्लीमध्ये जवळपास २५ लाख फॉलोअर्स आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश आणि दिल्लीमध्ये रामपालची आपली वेगळी प्रॉपर्टी पण आहे.  
रामपालचा जन्म १९५१मध्ये हरियाणातील सोनपत या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला होता. रामपाल शिक्षण पूर्ण केल्यानंतर हरियाणा सरकारच्या पाटबंधारे विभागात ज्युनिअर इंजिनिअर पदावर नोकरीवर होते. या दरम्यान, त्यांची भेट १०७ वर्षीय कबीरपंथीय संत स्वामी रामदेवानंद महाराज यांच्यासोबत झाली. रामपाल त्यांचे शिष्य झाले. यानंतर १९९५मध्ये त्यांनी १८ वर्षांपासूनची आपली नोकरी सोडून संत्संग करायला लागले. १९९९मध्ये त्यांनी सतलोक आश्रमचं भूमिपूजन केलं. 

बाबा रामपालजी महाराज कोणत्याच देवाला मानत नाही, कोणत्याही देवी-देवतांच्या पूजेच्या ते विरोधात आहेत. मात्र हेच बाबा रामपाल स्वत:ला परमेश्वर सांगतात. मागील १४ दिवसांच्या ड्रामानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री आश्रमातून रामपाल यांना अटक केली. 

कसा असतो रामपालचा संत्संग?

> ड्रग्जचा विरोध: बाबा रामपाल आपल्या अनुयायांना हुक्का, दारू, बियर, तंबाखू, बीडी, सिगारेट, गुटखा, मांसाहार, अंडे, अफीम, गांजा, चरस सारख्या अमली पदार्थांपासून दूर राहण्यास सांगतात. 
> तीर्थस्थळांवर जाण्यास विरोध: बाबा रामपाल कोणत्याही प्रकारचं व्रत, पूजा-पाठ मानत नाहीत. सोबतच गंगा स्नान, मंदिरात जाणंही निषिद्ध मानतात. 
> जन्म-मृत्यूनंतर होणाऱ्या कोणत्याही पूजेचा ते विरोध करतात. सोबतच पितरांची पूजाही करू नये असं सांगतात.
> मांसाहारी जेवण आणि जातीभेदचाही विरोध करतात. 
> रामपाल कोणत्याही कार्यक्रमात होणाऱ्या नाच-गाण्याला अश्लील मानतात आणि त्याचा पूर्णपणे विरोध करतात. 
> लग्नाच्यावेळी देण्यात येणाऱ्या हुंड्याचा ते विरोध करतात. त्यांचं म्हणणं आहे हुंडा देणं आणि घेणं देशातील अशांतीचं कारण आहे. 

काय आहे हा वाद?

२००६मध्ये स्वामी दयानंद यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकात संत रामपालनं आपलं मत लिहिलंय. आर्यसमाजाला ही टीप आवडली नाही आणि त्या दोघांच्याही समर्थकांमध्ये हिंसक लढाई झाली. घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर एसडीएमने १३ जुलै २००६मध्ये आश्रम ताब्यात घेतला. रामपाल आणि त्यांच्या २४ समर्थकांना अटक करण्यात आली. २००६मध्ये रामपाल यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला, त्यात २१ महिन्यांचा तुरूंगवासही त्यांनी भोगला. तेव्हापासून रामपाल जामीनावर आहे. गेल्या चार वर्षांमध्ये रामपालनं ४३ वेळा कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.