वहिनीच्या मदतीनं दिराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नळावर पाणी भरण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेवून, बंदुकीच्या धाकावर धमकावून एका नराधमानं तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी नराधमाच्या वहिनीनं या दृष्कृत्यात त्याला मदत केली.

| Updated: Nov 12, 2013, 09:53 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुजफ्फरनगर
नळावर पाणी भरण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेवून, बंदुकीच्या धाकावर धमकावून एका नराधमानं तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी नराधमाच्या वहिनीनं या दृष्कृत्यात त्याला मदत केली.
उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगरच्या बुढाना पोलीस स्टेशन अंतर्गत ही धक्कादायक घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुढाना परिसरातल्या जौळा गावात सकाळी पाचच्या सुमारास घडलेला हा प्रकार आहे. जेव्हा ही अल्पवयीन मुलगी सरकारी नळावर पाणी भरण्यासाठी गेली होती. तेव्हा तिथं तिच्या पाळतीवर बसलेल्या गावातल्याच एका तरुणानं बंदुकीचा धाक दाखवून तिला आपल्या घरात नेलं.
ज्यावेळी त्यानं मुलीवर बलात्कार केला तेव्हा त्या नराधमाची वहिनीही तिथंच उपस्थित होती. तिनं नराधमाला मदत केली. त्या नराधमाच्या तावडीतून सुटून घराबाहेर पडलेल्या मुलीनं आरडाओरडा केला. मुलीचा आवाज ऐकूण गावकरी आणि तिचे कुटुंबिय तिथं पोहोचले.
मुलीनं आपली आपबिती कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तरुण आणि त्याच्या वहिनीच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आलीय. पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.