पुन्हा... चालत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

‘दिल्ली गँगरेप’ घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही काही दिवसांतच पुन्हा या क्रूर घटनेची पुनरावृत्ती झालीय. झारखंडच्या खूंटी-रांची रोडवर एका बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचं उघड झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 24, 2013, 11:51 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रांची
‘दिल्ली गँगरेप’ घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही काही दिवसांतच पुन्हा या क्रूर घटनेची पुनरावृत्ती झालीय. झारखंडच्या खूंटी-रांची रोडवर एका बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचं उघड झालंय.
आरोपी बबन खान या ४० वर्षीय गृहस्थाला अटक करण्यात आलीय. तो रांचीच्या बुंडू भागात राहणारा आहे. लोकांनीच पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. पोलिसांनी केवळ छेडछाडीची तक्रार दाखल केली असली तरी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलीवर बलात्कार झालाय. यानंतर डीआइजी शीतल उराव यांनी मेडिकल रिपोर्टनुसार कारवाई केली जाईल, असं म्हटलंय.
जेएच ०१ झेड ४७७३ या नंबरची बस चाईबासाकडून रांचीकडे निघाली होती. खूंटी बसस्टॅंडवर आपल्या घराकडे निघालेली एक अल्पवयीन मुलगी आणखी काही मुला-मुलींसोबत बसमध्ये चढली होती. पीडित मुलगी केवळ सात वर्षांची आहे. एका प्रवाशानं या मुलीला आपल्या मांडीवर बसवलं. इतर मुले इकडे-तिकडे बसली. काही वेळातच बसमधील प्रवाशांची संख्या कमी झाली. त्यानंतर या गृहस्थानं या मुलीला मागच्या सीटवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

हुटारमध्ये उतरल्यानंतर या मुलीनं आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तातडीनं बसचा पाठलाग करून बस थांबविली आणि आरोपीला पकडलं आणि बेदम चोप दिला. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
पीडित मुलगी अजुनही दहशतीखाली आहे. आरोपीला आणि बसला ताब्यात घेण्यात आलंय... यासंबंधी बसच्या कंडक्टरचीदेखील चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.