दिल्ली गँगरेपला 'ती' मुलगी जबाबदार- आसाराम बापू

स्वयंघोषित गुरू आसाराम बापू नव्या वादात अडकलेत. दिल्ली बलात्कारावर भाष्य करताना `टाळी एका हाताना वाजत नाही`, असं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत आसाराम बापूंनी धुरळा उडवून दिलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 8, 2013, 07:23 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
स्वयंघोषित गुरू आसाराम बापू नव्या वादात अडकलेत. दिल्ली बलात्कारावर भाष्य करताना `टाळी एका हाताना वाजत नाही`, असं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत आसाराम बापूंनी धुरळा उडवून दिलाय.
या बलात्काराला केवळ आरोपी जबाबदार नाहीत, तर पीडित मुलगीही तितकीच जबाबदार आहे, अशी मुक्ताफळं आसाराम बापूंनी उधळली आहेत.

बलात्कार होत असताना तिनं हल्लेखोरांच्या पाया पडायला हवं होतं, त्यांना ‘भाऊ’ म्हणायला हवं होतं, असा उपदेशाचा डोसही आसाराम बापूंनी पाजलाय.