‘धरतीच्या अस्तित्वापर्यंत बलात्कार होतच राहतील’

‘जोपर्यंत पृथ्वीचं अस्तित्व असेल तोपर्यंत बलात्कार होतच राहतील’ असं वादग्रस्त वक्तव्य एका नेत्यानं केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यानं हे धक्कादायक विधान केलंय.

Updated: Aug 28, 2014, 04:10 PM IST
‘धरतीच्या अस्तित्वापर्यंत बलात्कार होतच राहतील’

कोलकाता : ‘जोपर्यंत पृथ्वीचं अस्तित्व असेल तोपर्यंत बलात्कार होतच राहतील’ असं वादग्रस्त वक्तव्य एका नेत्यानं केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यानं हे धक्कादायक विधान केलंय.

डायमंड हार्बर क्षेत्रातील आमदार दीपक हल्दर यांनी बुधवारी हे वक्तव्य केलंय. ‘याअगोदरही रेप होत आलेत... आजही रेप होत आहेत... जेव्हापर्यंत ही धरती राहील तेव्हापर्यंत रेप होतच राहतील’ असं हल्दर यांनी एका जाहीर सभेत म्हटलंय.

काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी टीएमसी नेत्याच्या या बडवडीवर जोरदार आक्षेप व्यक्त केलाय. ही संपूर्णत: असंवेदनशील टिप्पणी असल्याचं तिवारी यांनी म्हटलंय. तसंच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता शर्मा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे, हल्दर यांच्या या असंवेदनशील वक्तव्यासाठी त्यांना हटवण्याची मागणी केलीय.

आपल्या विधानसभा क्षेत्रातील एका जाहीर सभेत हल्दर यांनी हे वक्तव्य केलं. परंतु, यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर मात्र लगेचच हल्दर यांनी आपल्या वक्तव्यावरून माघार घेतली. जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी आपण असं म्हटल्याचं स्पष्टीकरण हल्दर यांनी दिलं. ‘मीडियानं याचा विपर्यास करू नये, मी बलात्काराचं समर्थन करत नाही... मी केवळ यासाठी असं म्हटलं कारण हा एक सामाजिक प्रश्न आहे... आणि एकट्या ममता बॅनर्जी या प्रश्नाचं उत्तर शोधू शकत नाही’ असं हल्दर यांनी म्हटलं.

यापूर्वीही, टीएमसीचे खासदार तपस पाल यांनीही असंच एक वक्तव्य केलं होतं... ‘सीपीएमचे लोक आपल्या कार्यकर्त्यांचे केस पकडत असतील तर आपल्या मुलांना सीपीएमच्या मुलींवर बलात्कार करण्याचे आदेश देऊ’ असं घृणास्पद वक्तव्य पाल यांनी केलं होतं.... पाल यांच्यानंतर हल्दर यांच्या या वक्तव्यामुळे तृणमूलच्या अडचणींत वाढ झालीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.