छत्तीसगडमध्ये आढळला दुर्मिळ `ब्लॅक हेडेड` साप

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक दुर्मिळ जातीचा साप आढळलाय. या सापाचं वैज्ञानिक नाव `ड्लुमेरिअल ब्लॅक हेडेड` असं आहे तसंच स्थानिक भाषेत या सापाला `सटक` म्हटलं जातं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 10, 2014, 07:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक दुर्मिळ जातीचा साप आढळलाय. या सापाचं वैज्ञानिक नाव `ड्लुमेरिअल ब्लॅक हेडेड` असं आहे तसंच स्थानिक भाषेत या सापाला `सटक` म्हटलं जातं.
सूबेमध्ये सापांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या `नोवा नेचर वेल्फेअर सोसायटी` या संस्थेच्या म्हणण्यानुसार हे साप छत्तीसगड आणि मध्यभारतात यापूर्वी कधीही आढळला नव्हता.
सापांवर अभ्यास करणाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. हा साप मुख्यत्वे राजस्थान, बांग्लादेश आणि श्रीलंकेमध्ये आढळतात. `नोवा`चे सचिव आणि साप विशेषज्ज्ञ मोईज खान यांच्या म्हणण्यानुसार, या सापाचा दुर्मिळ प्रजातींमध्ये समावेश करण्यात आलाय. या सापाचं अस्तित्व सर्प विशेषज्ज्ञ, वाइल्ड लाइफ स्पेशालिस्ट यांना अभ्यासासाठी छत्तीसगडकडे आकर्षित करू शकेल, असं काहींचं म्हणणं आहे.
रायपूरलगतच्या सरोना रेल्वे स्टेशनजवळ एक साप आढळल्याची सूचना, नोवा नेचरच्या टीमला मिळाली होती. टीमच्या सदस्य जेव्हा इथं दाखल झाले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का लागला. कारण, यापूर्वी त्यांनी या जातीचा साप कधीही पाहिला नव्हता. हा साप मोठ्या झाडांच्या बुंध्यात आपले मोठे मोठे बिळ बनवतात. एका वेळेस हे साप २ ते ४ अंडी देतात. या सापाची लांबी कमीत कमी १० इंच आणि जास्तीत जास्त १८ इंच असते. छोट्या आकाराचा साप बिनविषारी असतो. तसंच त्याला पकडणंही सहज शक्य असतं.
या सापाचं वैशिष्ट्यं म्हणजे, तो दिवस-रात्र सक्रिय असतो. या सापाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आता वन विभागाचीही मदत घेण्यात येणार आहे. तसंच, लवकरच हा साप मिळाल्याची सूचना सापांच्या डिस्ट्रीब्युशन ठरवणाऱ्या संस्थेलाही केली जाणार आहे. त्यामुळे, डिस्ट्रीब्युशनसंबंधी नकाशातही छत्तीसगडमध्ये `ड्लुमेरिअल ब्लॅक हेडेड` साप आढळल्याची माहिती उपलब्ध होईल.
या सापाचं तोंड काळ्या रंगाचं असल्यानं त्याला ब्लॅक हेडेड म्हटलं जातं. आकारानं हा साप छोटा दिसत असला तरी तो आपल्याच जातीच्या छोट्या सापांना आपलं भक्ष्य बनवतो. या सापाचं मुख्य भोजन म्हणजे पाल, उंदीर आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.