कर्जाच्या हप्त्यांत होणार कपात?

रिझर्व्ह बॅँकनं मध्य तिमाही पतधोरण जाहीर केलयं. या पतधोरणात रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात केली गेलीय. रेपो रेट आता ७.५ अंशावर आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 19, 2013, 11:55 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
रिझर्व्ह बॅँकनं मध्य तिमाही पतधोरण जाहीर केलयं. या पतधोरणात रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात केली गेलीय. रेपो रेट आता ७.५ अंशावर आलाय. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानं कर्जाच्या हप्त्यांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. यामुळं महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
धिम्या विकास दराला संजीवनी देण्याच्या प्रयत्नात आरबीआयनं प्रमुख दरांत ०.२५ टक्के घट करण्याची घोषणा केलीय. यासाठी रिझर्व्ह बँकेवर दबाव असल्याचं दिसून येत होतं. या अगोदर ७.७५ अंशावर असलेल्या रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची घट झाल्यानं सामान्यांना मात्र थोडाफार दिलासा मिळालाय.

२९ जानेवारी जाहीर झालेल्या तिसऱ्या तिमाही पतधोरणात आरबीआयनं सीआरआर (कॅश रिझर्व्ह रेशो) मध्ये ०.२५ टक्के घट करून चार अंशांवर आणलं होतं. सीआरआर म्हणजे, एक ठराविक रक्कम जी देशातील सर्व बँकांना आरबीआयकडे ठेवीच्या स्वरुपात जमा करावी लागते.