RBIनं रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं केली कपात, गृहकर्ज स्वस्त होणार

गृहकर्ज असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी आरबीआयनं आपल्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं कपात केलीय. त्यामुळं आता रेपो रेट 6.75 टक्के झालाय.

Updated: Sep 29, 2015, 12:16 PM IST
RBIनं रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं केली कपात, गृहकर्ज स्वस्त होणार title=

नवी दिल्ली: गृहकर्ज असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी आरबीआयनं आपल्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं कपात केलीय. त्यामुळं आता रेपो रेट 6.75 टक्के झालाय.

सोबतच रिव्हर्स रेपो रेट पण 0.5 टक्क्यांनी कमी करत 5.75 टक्के झालाय. आरबीआयनं सीआरआरमध्ये मात्र काही बदल केला नाही. त्यामुळं CRR 4 टक्के कायम आहे. आता आरबीआयच्या या निर्णयानंतर बँकेच्या इएमआयमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. पण त्याचा अखेरचा निर्णय बँकेचा असेल.

आरबीआयला विश्वास आहे की, जानेवारी 2016पर्यंत महागाईचा दर 5.8 टक्क्यांपर्यंत जाईल. आरबीआयनं वाढीचं लक्ष्य कमी केलंय. आरबीआयनं 2016 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी दर 7.6 टक्क्यांहून कमी करत 7.4 टक्के निश्चित केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.