सरकारी नोकऱ्यांमध्ये अपंगांना ३ टक्के आरक्षण!

By Aparna Deshpande | Last Updated: Wednesday, October 9, 2013 - 08:43

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
सुप्रीम कोर्टानं अपंगांना मोठा दिलासा दिलाय. अपंगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३ टक्के आरक्षण देण्याच्या धोरणाची येत्या तीन महिन्यात अंमलबजावणी करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र तसंच सर्व राज्य सरकारांना दिलेत.
सर्व सरकारी खाती, कंपन्या आणि संस्थांमध्ये अपंगांच्या आरक्षणाची तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी, असे कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलंय. शिवाय अपंगांसाठीच्या या आरक्षणाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी करण्याबाबतही कोर्टानं बजावलंय.
सरकारी कार्यालयांमध्ये अपंगांना कोणतं काम देता येईल, याबाबत तीन महिन्यात निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. अंध, मूकबधिर आणि सेलिब्रल पाल्सी या व्यक्तींसाठी प्रत्येकी एक टक्का आरक्षण असावं, असंही कोर्टानं म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.First Published: Wednesday, October 9, 2013 - 08:43


comments powered by Disqus