आता, ताटातून डाळीबरोबर 'भात'ही गायब होणार?

सर्वसामान्यांच्यात ताटातून वरण गायब झाल्यानंतर आता भातही गायब होण्याची चिन्हे आहेत. 

Updated: Nov 17, 2015, 04:36 PM IST
आता, ताटातून डाळीबरोबर 'भात'ही गायब होणार? title=

मुंबई : सर्वसामान्यांच्यात ताटातून वरण गायब झाल्यानंतर आता भातही गायब होण्याची चिन्हे आहेत. 

तांदळाचा कमी साठा आणि खरीप हंगामात उत्पादन घटल्यानं भाव गगनाला भिडण्याची भीती व्यक्त होऊ लागलीय. उद्योजक आणि व्यापाऱ्यांची देशव्यापी संघटना असोचेमनं नुकताच एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केलाय. 

त्यानुसार गेली चार वर्ष सातत्यानं तांदळाच्या उत्पादनात घट झालीय. त्यात यंदा पावसानंही दगा दिलाय. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

सध्या घाऊक बाजारातले तांदळाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण ३० टक्क्यांनी कमी आहेत.  असं असलं तरी योग्य ते उपाय न केल्यास तांदळाचे भाव ग्राहकांचा खिसा खाली करू शकतो. येत्या काही महिन्यात तांदळाच्या भावात वाढ होण्याची भीती उद्योग समूहानं व्यक्त केलीय. 

सरकारी आकडेवारी नुसार गेल्यावर्षी देशात तांदळाचं उत्पादन १३.८९ दशलक्ष मेट्रिक टन होतं. यंदा हे उत्पादन कमी होऊन ९.०६ दशलक्ष मेट्रिक टन राहील असा अंदाज आहे. त्यामुळे अर्थातच त्याचा बाजार भाव परिणाम होईल, असा निष्कर्ष 'असोचेम'नं काढलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.