रेल्वेत निघाली बंपर भरती, २५०० TTE भरणार

Last Updated: Wednesday, July 16, 2014 - 19:21
रेल्वेत निघाली बंपर भरती, २५०० TTE भरणार

नवी दिल्ली  : रेल्वे मंत्रालयाने देशभरातील २५०० टीटीईच्या भरतीला मंजुरी दिली आहे. यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी भरती मानली जात आहे. 

रेल्वेच्या रेकॉर्डनुसार प्रवाशांची संख्या कमी झाले आहे, मात्र प्रत्यक्षात कोणत्याही रूटवरील ट्रेन ही प्रवाशांनी खचखचून भरलेली असते. या विचित्र समस्येपासून मार्ग काढण्यासाठी रेल्वेने अशा प्रकारची भरती योजना आखली आहे. 

सामान्यतः उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वे गाड्या प्रवाशांनी भरलेल्या असतात.  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिल आणि मे दरम्यान प्रवाशांची संख्या १ कोटी ९० लाख रुपयांनी कमी झाल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्येत वाढ झाल्यामुळे ही संघ्या घटली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

विना तिकीट प्रवासींना पकडण्यासाठी रेल्वेने नुकतीच एक मोहीम सुरू केली होती. त्यामुळे वरील बाब लक्षात आली आहे. रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करण्याचे धाडस हे तिकीट चेकर नसल्यामुळे वाढले आहे. तिकीट चेकरची संख्या कमी असल्यामुळे हे प्रकार वाढीस लागले आहेत. 

या संदर्भात रेल्वेमध्ये सुमारे ६००० तिकीट चेकरची भरती योजना आहे. यातील पहिल्या टप्प्यात २५०० टीटीईंची भरती करण्यात येणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Wednesday, July 16, 2014 - 19:19
comments powered by Disqus