Whatsapp वरील मेसेजने घेतला दोघांचा बळी

Whatsappवर तुम्ही बराच वेळ घालवत असाल तर जरा सावधान, रोहतासमध्ये whatsapp वरील मेसेजने वाद झाल्यामुळे पोलिसांनी केलेल्या फायरिंगमुळे दोघा निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

PTI | Updated: Jul 10, 2014, 08:36 PM IST
Whatsapp वरील मेसेजने घेतला दोघांचा बळी title=

रोहतास : Whatsappवर तुम्ही बराच वेळ घालवत असाल तर जरा सावधान, रोहतासमध्ये whatsapp वरील मेसेजने वाद झाल्यामुळे पोलिसांनी केलेल्या फायरिंगमुळे दोघा निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

दुदैवाची गोष्ट अशी की या दोघांचा त्या whatsapp मेसेजशी काहीच संबंध नाही. रोहतासमध्ये दोन समुदायातील मित्रांमध्ये whatsapp वर हिंदीमध्ये आक्षेपार्ह मेसेज पाठविण्यात आला होता. या मेसेजबाबत जेव्हा तरुणाच्या घरच्यांना समजले तर त्यांनी मेसेज पाठविणाऱया अजय कुमार या तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आक्षेपार्ह मेसेज पाठविण्याबद्दल अजयला अटक करण्यात आली.  

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अजयच्या विरोधात स्थानिक लोकांनी रोहतास पोलीस स्टेशन बाहेर प्रदर्शन केले. यावेळी जमलेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी ओपन फायरिंग केली. यात फायरिंगमध्ये २१ वर्षाचा प्रदीप पासवान आणि २५ वर्षांचा प्रदीप कुशवाह हे मृत्यूमुखी पडले. जमावात हे दोघेही सामील होते.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.