राज्यसभेत घुमला थप्पडीचा आवाज

एआयडीएमकेच्या महिला खासदार शशिकला पुष्पा यांनी तीन दिवसांपूर्वी  डीएमके खासदार तिरुची शिवा यांना दिल्ली विमानतळावर थप्पड मारल्याचा आरोप आहे.

Updated: Aug 1, 2016, 05:17 PM IST
राज्यसभेत घुमला थप्पडीचा आवाज  title=

नवी दिल्ली : एआयएडीएमकेच्या महिला खासदार शशिकला पुष्पा यांनी तीन दिवसांपूर्वी  डीएमके खासदार तिरुची शिवा यांना दिल्ली विमानतळावर थप्पड मारल्याचा आरोप आहे.  जयललितांविरोधात शिवा यांनी वक्तव्य केल्यानं शशिकला यांनी थप्पड मारल्याचं बोललं जात आहे. 

शशिकला यांचा हा मुद्दा राज्यसभेतही गाजला. यावेळी बोलताना शशिकला भावूक झाल्या. यावेळी बोलताना शशिकला यांनी त्यांच्याच पक्षावर धक्कादायक आरोप केले. माझ्या पक्षातल्याच नेत्यानं मला थप्पड मारली होती. माझ्या जीवाला धोका आहे त्यामुळे मला सुरक्षा द्या. राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्यासाठीही माझ्यावर दबाव आहे, असं शशिकला राज्यसभेत म्हणाल्या.

 पाहा काय म्हणाल्या शशिकला पुष्पा

पक्षाविरोधात बोलल्यामुळे शशिकला यांच्यावर एआयडीएमकेनं कारवाई केली आहे. त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे.