एअर होस्टेसच्या नावाखाली ती करायची लाल चंदनाची तस्करी, या मॉडेलला अटक

पोलिसांनी एका माजी मॉडेल आणि एअर होस्टेसला लाल चंदनच्या कथित तस्करी प्रकरणी अटक केली आहे. चित्तूर पोलीसांनी बुधवारी संगीता चटर्जी हिला कोलकाता येथील निवासी वसाहतीतून अटक केले. संगीता लाल चंदन तस्करी करणाऱ्या नेटवर्कची सदस्य होती.

Updated: May 13, 2016, 03:46 PM IST
एअर होस्टेसच्या नावाखाली ती करायची लाल चंदनाची तस्करी, या मॉडेलला अटक title=

कोलकाता : पोलिसांनी एका माजी मॉडेल आणि एअर होस्टेसला लाल चंदनच्या कथित तस्करी प्रकरणी अटक केली आहे. चित्तूर पोलीसांनी बुधवारी संगीता चटर्जी हिला कोलकाता येथील निवासी वसाहतीतून अटक केले. संगीता लाल चंदन तस्करी करणाऱ्या नेटवर्कची सदस्य होती.

कोणाची ती प्रेमिका?

कुख्यात आंतरराष्ट्रीय लाल चंदन माफिया मारकोन्दान लक्ष्मण तथा लक्ष्मण डांगे ऊर्फ तामंगची ती प्रेमिका होती. तामंगला चित्तूर पोलिसांनी २०१४मध्ये नेपाळमधून अटक केली होती. तामंगच्या अटकेनंतर त्याचा संपूर्ण कारभार संगीता संभाळत होती.

देशात कोठे आहे नेटकवर्क?

मीडियाच्या सूत्रानुसार संगीताची पोलिसांनी चौकशी केली असता ती माफिया तामंगच्या तस्करीची संपूर्ण जबाबदारी संभाळत असल्याचे समजले. याचे नेटवर्क मुंबई, चेन्नई, बंगळुरु आणि कोलकाता या प्रमुख शहरात पसरलेले आहे. यात तिची भूमिका प्रमुख होती.

नेटवर्कसाठी प्रमुख भूमिका

चित्तूरमधील एसआयटीने ट्रांजिट रिमांडसाठी संगीताला कोलकाता येथील एका कोर्टात हजर केले. मात्र, कोर्टाने तिला जामीन दिला.  संगीताने लाल चंदन तस्करीसाठी देशात तामंग याचे जाळे पसरविण्यासाठी प्रमुख भूमिका बजावली. तामंग म्यानमारमध्ये लाल चंदनाची तस्करी करीत होता. यातून तामंग आणि संगीताने कोट्यवधी रुपये कमावलेत, अशी माहिती एसपी सी श्रीनिवास यांनी दिली.

12वीपर्यंत शिक्षण, जाहिरात मॉडेल

संगीता केवळ १२ वीपर्यंत शिकलेली आहे. त्याआधी ती टीव्ही जाहिरातींसाठी मॉडेलिंग करायची. त्यानंतर एक प्रशिक्षण केल्यानंतर ती एअर होस्टेस झाली.

कोलकातामधील एका पार्टीत लक्ष्मणच्या संपर्कात आली. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या जवळ आलेत. लक्ष्मण मणिपूरचा रहिवासी आहे. मात्र, तो पत्नीसोबत चेन्नईत राहतो. अटक होईपर्यंत तो लाल चंदन तस्करीत तो कुख्यात होता. तो चित्तूर, कुरनुल आणि कडप्पा या जिल्ह्यातील जंगलात चंदनाची तस्करी करायचा.