एसबीआयची खुशखबर, कर्जाच्या व्याजात कपात

देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने कर्जाच्या व्याज दरात 0.15 टक्क्यांची कपात केलीय, त्यामुळे स्टेट बँकेच्या कर्जाचा नवा व्याजदर आता 9.10 टक्के होणार आहे.

Updated: Apr 3, 2017, 10:45 PM IST
एसबीआयची खुशखबर, कर्जाच्या व्याजात कपात  title=

मुंबई : देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने कर्जाच्या व्याज दरात 0.15 टक्क्यांची कपात केलीय, त्यामुळे स्टेट बँकेच्या कर्जाचा नवा व्याजदर आता 9.10 टक्के होणार आहे. स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वाहनकर्ज स्वस्त होतील, तसंच आधी कर्ज घेतलेल्या कर्जदारांचाही हप्ता कमी होण्याची शक्यता आहे.

याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेची व्याजदरातली कपात सूचक असल्याचे बोललं जातंय. स्टेट बँकेचा कर्ज देण्यासाठी असलेला आधार दर किंवा प्रमाण दर 9.25 टक्के होता. एक एप्रिलपासून तो दर 9.10 टक्के झालाय. प्रमाणदरात कपात केल्यामुळे या आधी कर्ज घेतलेल्या ग्राहकांनाही व्याजदर कपातीचा लाभ मिळणार आहे.