कर्ज चुकवण्याचे विजय मल्ल्याचे मनसुबे उघळले!

चार हजार कोटींमध्ये बँकांची बोळवण करून उरलेलं पाच हजार कोटींचं कर्ज बुडवण्याचे विजय मल्ल्याचे मनसुबे उधळळे गेलेत.

Updated: Apr 7, 2016, 11:20 PM IST
कर्ज चुकवण्याचे विजय मल्ल्याचे मनसुबे उघळले! title=

नवी दिल्ली : चार हजार कोटींमध्ये बँकांची बोळवण करून उरलेलं पाच हजार कोटींचं कर्ज बुडवण्याचे विजय मल्ल्याचे मनसुबे उधळळे गेलेत.

एकीकडे बँकांनी त्याचा हा प्रस्ताव फेटाळला असतानाच सुप्रीम कोर्टानंही 'आपल्या संपत्तीचा सर्व तपशील कोर्टाला सांगावा', असे आदेशही मल्ल्याला देण्यात आलेत. 

या प्रकरणी न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. आर.एफ. नरिमन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मल्ल्या आणि त्याच्या कंपन्यांना संपत्तीचा तपशिल जाहीर करण्यासाठी २१ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलीय.

मल्ल्या याला खरोखरच कर्जाचं प्रकरण मिटवायचं असेल, तर त्यानं आधी देशात परत येऊन आपल्या प्रयत्नांची खात्री पटवली पाहिजे, असं मल्ल्यानं कर्ज थकवलेल्या १७ बँकांच्या संघटनेनं म्हटलंय. या प्रकरणाची पुढली सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार आहे.