इंटरनेटचा वापर न करता पाहा मोबाईलवर टीव्ही

तुम्हाला टीव्ही आणि मोबाईलवर २ ऑक्टोबरपासून टीव्हीचं प्रसारण बिना इंटरनेटने पाहता येणार आहे, ही सुविधा सध्या १६ शहरांमध्ये आहे, या नुसार एकूण २० चॅनेल तुम्ही पाहू शकता. यात पाच दूरदर्शनचे असतील आणि १५ चॅनेल्सचा लिलाव होणार आहे.

Updated: Sep 20, 2015, 04:28 PM IST
इंटरनेटचा वापर न करता पाहा मोबाईलवर टीव्ही title=

नवी दिल्ली : तुम्हाला टीव्ही आणि मोबाईलवर २ ऑक्टोबरपासून टीव्हीचं प्रसारण बिना इंटरनेटने पाहता येणार आहे, ही सुविधा सध्या १६ शहरांमध्ये आहे, या नुसार एकूण २० चॅनेल तुम्ही पाहू शकता. यात पाच दूरदर्शनचे असतील आणि १५ चॅनेल्सचा लिलाव होणार आहे.

दूरदर्शनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी कोणताही शुल्क तुम्हाला द्यावा लागणार नाहीय. यासह १० रेडिओ चॅनेल्स देखील तुम्हाला ऐकता येणार आहे.

अॅड्रॉईड आणि आयफोनवर या प्रसारणाचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेरेस्ट्रियल सिग्नलचा प्रयोग आपातकालिन स्थितीत करता येणार आहे.

१८० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या वाहनांत देखील ही सुविधा घेता येणर आहे, यापुढे रेल्वेतही या प्रसारणाचा वापर होण्याची शक्यता वाढली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.