पाहा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमधील महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष

कानपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. लखनऊ-झांशी इंटरसिटी एक्सप्रेसनं कानपूर स्थानकावर उतरत असताना हा अपघात झाला.

Updated: Dec 2, 2013, 04:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कानपूर
कानपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. लखनऊ-झांशी इंटरसिटी एक्सप्रेसनं कानपूर स्थानकावर उतरत असताना हा अपघात झाला. अपघातात प्राण गमावलेली महिला स्थानकावर उतरत असताना धक्का-बुक्की झाल्यामुळं तिचा पाय घसरला आणि ती महिला रेल्वे आणि प्लेटफॉर्मच्यामध्ये अडकली. प्रवाशांनी त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी ठरला नाही.

खूप प्रयत्नांनंतर मग जीआरपीला बोलवण्यात आलं. जीआरपीच्या जवानांनी त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही यश आलं नाही. त्यानंतर प्लॅटफॉर्मचा तो भाग तोडण्यात आला. जिथं महिला अडकली होती. परंतु या सर्व कामाला पाऊण तास लागल्यामुळं ती महिला बेशुद्ध झाली. कसं-बसं महिलेला काढण्यात आलं आणि ताबोडतोब रुगणालयात पाटवण्यात आलं. पण तोपर्यंत त्या महिलेचा मृत्यू झाला होता.

त्या महिलेच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, रेल्वेच्या परीक्षेमुळं भरपूर गर्दी होती आणि विद्यार्थ्यांमुळं धक्का-बुक्कीमध्ये महिलेचा पाय घसरला. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी हा अपघात आपल्यामुळं झालेला नाही असं सांगितलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, चुकी महिलेचीच होती, त्या चालत्या ट्रेनमधून उतरल्या. रेल्वेच्या नियमांप्रमाणं ट्रेन थांबण्याच्या आधीच महिला उतरुन गेल्या. त्यामुळं ती महिला पाय घसरुन ट्रेन आणि प्लेटफॉर्मच्यामध्ये अडकली. हा कोणताही साधा अपघात नव्हता. हा अपघात त्या महिलेच्या चुकीमुळं झाला. त्यामुळं त्यास कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.