अजगरासोबत सेल्फी काढणं पडलं महाग

राजस्थानच्या माऊंट अबूमध्ये एका तरुणाला अजगरासोबत सेल्फी काढणं चांगलंच महागात पडलं आहे.

Updated: Sep 23, 2016, 10:57 PM IST
अजगरासोबत सेल्फी काढणं पडलं महाग title=

माऊंट अबू : राजस्थानच्या माऊंट अबूमध्ये एका तरुणाला अजगरासोबत सेल्फी काढणं चांगलंच महागात पडलं आहे. न्यूज एजन्सी एएनआयनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 10 ते 15 जण दिसत आहेत, यातले चार-पाच जणं अजगराला पकडून उभे आहेत. तर एक तरुण अजगाराबरोबर सेल्फी काढत आहे.

हा सेल्फी काढत असतानाच अजगरानं या तरुणावर हल्ला केला. अजगराला पकडलं असल्यामुळे या तरुणाला मोठी इजा झाली नाही.

पाहा अजगराच्या हल्ल्याचा व्हिडिओ