निवडणूक आयोगाची ब्रँड अँबॅसिडर ७ वर्षाची मुलगी

तामिळनाडूत ७ वर्षाची मुलगी निवडणूक आयोगाची ब्रँण्ड अँबॅसिडर होणार आहे. तामिळनाडूत मे महिन्यात निवडणुका होणार आहेत.

Updated: Mar 27, 2016, 12:34 PM IST
 निवडणूक आयोगाची ब्रँड अँबॅसिडर ७ वर्षाची मुलगी title=

तिरुवन्नामलाई : तामिळनाडूत ७ वर्षाची मुलगी निवडणूक आयोगाची ब्रँण्ड अँबॅसिडर होणार आहे. तामिळनाडूत मे महिन्यात निवडणुका होणार आहेत.

इयत्ता दुसरीत जाणारी सात वर्षाची प्रिती यावर्षी मतदान जागृती अभियानात निवडणूक आयोगाच्या सोबत काम करणार आहे. मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी निवडणूक आयोग मतदानाआधी जनजागृती करत असते. 

मे महिन्यात तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने सात वर्षाच्या प्रितीची ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड केली आहे. 

तामिळनाडूतील २३४ विधानसभा मतदारसंघांची नावे प्रितीला पाठ आहेत, म्हणून तिची निवड करण्याचं हे महत्वाचं कारण असल्याचं सांगण्यात येतंय. प्रिती फक्त ५ मिनिटात राज्यातील सर्व मतदारसंघाची नावे तिला तोंडपाठ सांगते.

मतदान जागृतीसाठी तयार करण्यात येणाऱ्या शॉट फिल्ममध्ये तिचा समावेश करण्यात आल्याचे, लखानी म्हणाले. निवडणूक आयोगाने राज्यातून एकूण १ हजार २०० ब्रँड अँबॅसिडर निवडले आहेत. यात अभिनेते, क्रीडापटूंचा समावेश आहे.

विलानल्लडपूर येथील युनियन मिडल स्कूलमध्ये शिकणाऱ्या प्रितीला चेय्यर विधानसभा मतदारसंघाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड करण्यात आल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजेश लखानी यांनी सांगितले.