आसाराम बापू शुद्ध चारित्र्याचे- नारायण साई

By Aparna Deshpande | Last Updated: Wednesday, September 18, 2013 - 16:04

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूंची पाठराखण त्यांचा मुलगा नारायण साईनं केलीय. आसाराम बापूंचं चारित्र्य शुद्ध आहे, त्याविषयी संपूर्ण जनतेलाही लवकरच खरं ते कळेल असं साई म्हणाले.
नारायण साई आपल्या वडिलांच्या बचावासाठी पुढं आले. आसाराम फक्त माझे वडील नाही तर ते कोट्यवधी भाविकांची संपत्ती असल्याचं साई म्हणाले. पीडित मुलीला कोणता आजार आहे, असं विचारलं असता, या प्रश्नाचं उत्तर आमचे वकील देतील, असंही साई म्हणाले. मात्र काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी ही मानसिक आजारानं ग्रस्त असल्याचं साईनं म्हटलं होतं.
१६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू जोधपूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना १ सप्टेंबरला इंदूरच्या आश्रमातून अटक करण्यात आली. त्यानंतर आज जोधपूर कोर्टात त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. आसाराम बापूंचं वकिलपत्र ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी घेतलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.First Published: Wednesday, September 18, 2013 - 16:03


comments powered by Disqus