आसाराम बापूप्रकरणी कोर्टानं निकाल ठेवला राखून

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, September 4, 2013 - 14:17

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आसाराम बापूच्या जामिनावर सुनावणी पूर्ण झालीय. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आसाराम बापू आहे. मात्र, यावरचा निकाल कोर्टानं राखून ठेवल्यामुळे बापूंना अजून तरी न्यायालयीन कोठडीतच राहावं लागेल, अशी शक्यता आहे.
दुसरीकडे आसाराम बापूंच्या अडचणी आणखी वढल्यात. चौकशीदरम्यान बापूचे सहकारी शिवा यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. बापू महिलांना आणि तरूणींना रात्री ८ नंतर एकांतात भेटत असत, अशी माहिती शिवांनं दिलीये. काल झालेल्या सुनावणीदरम्यान आसाराम बापूंना फसवलं जात असल्याचं त्यांच्या वकिलींनी म्हटलं होतं. एफआयआरमध्ये रेप हा शब्द नाही त्यामुळे हे षडयंत्र असल्याचा बचाव वकिलांनी केला आहे. तर दुसरीकडे सरकारी पक्ष बापूंना जामिन मिळू नये यासाठी प्रयत्न करणार आहे.
आसाराम बापूंना दिल्या जात असलेल्या सुरक्षेबाबत सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेत. कोर्टानं आसाराम बापूंचं नाव घेतलेलं नाही. मात्र व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत टिप्पणी करताना एका आरोपीला इतकी सुरक्षा का दिली जात आहे, असा सवाल करत कोर्टानं पोलीस यंत्रणांना फटकारले आहे.
दरम्यान, आसाराम बापूंच्या गोरेगावातल्या आश्रमात गैरकारभार चालत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. आश्रमात तोडफोडही करण्यात आलीय. हा आश्रम बेकायदेशीर असल्याचंही रहिवाशांचं म्हणणंय. गोरेगाव पूर्व इथलं एक एकर मैदान हडप करून हा आश्रम सुर करण्यात आलाय. इथे लैंगिक अत्याचार होत असल्याचंही महिलांचं म्हणण आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, September 4, 2013 - 14:15
comments powered by Disqus