'शक्तीमान'साठी अमेरिकेतून येणार कृत्रिम पाय!

भाजप आमदाराकडून करण्यात आलेल्या आंदोलनात काही दिवसांपूर्वी 'शक्तीमान' या घोड्याला आपला पाय गमवावा लागला होता. शक्तीमानसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 

Updated: Mar 22, 2016, 10:26 AM IST
'शक्तीमान'साठी अमेरिकेतून येणार कृत्रिम पाय! title=

देहरादून : भाजप आमदाराकडून करण्यात आलेल्या आंदोलनात काही दिवसांपूर्वी 'शक्तीमान' या घोड्याला आपला पाय गमवावा लागला होता. शक्तीमानसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 

शक्तीमानसाठी लवकरच त्याचं वजन पेलू शकेल असा एक पाय अमेरिकेतून येणार आहे. 

गेल्या गुरुवारी शक्तीमानवर शस्रक्रिया करून त्याला एक आर्टिफिशिअल पाय लावण्यात आला होता. पण, शक्तीमानचं वजनाच्या मानाने हा पाय त्याला उपयोगी ठरणार नाही. शिवाय हा पाय लावल्यानं डॉक्टरांना औषधोपचार करण्यात अडथळे येत होते. त्यामुळे डॉक्टरांनी हा पाय काढून टाकला. 

आता डॉक्टरांनी अमेरिकेतून एक नवा पाय मागवलाय. याची किंमत जवळपास तीन हजार डॉलर म्हणजेच दोन लाख रुपये आहे. गेल्या १० वर्षांपासून उत्तराखंड पोलिसांसाठी काम करणारा शक्तीमान आपल्या कृत्रिम पायावर उभा राहू शकेल, अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत.