शशी थरूर उवाच- स्वामी विवेकानंद करायचे मद्यपान!

नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारे शशी थरूर यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानानं नव्या वादाला तोंड फोडलंय. रामकृष्ण मिशनचे संस्थापक स्वामी विवेकानंद मद्यपान करत असल्याचं खळबळजनक वक्तव्य शशी थरूर यांनी केलं असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 17, 2013, 01:21 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, तिरुवनंतपुरम
नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारे शशी थरूर यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानानं नव्या वादाला तोंड फोडलंय. रामकृष्ण मिशनचे संस्थापक स्वामी विवेकानंद मद्यपान करत असल्याचं खळबळजनक वक्तव्य शशी थरूर यांनी केलं असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे. एवढंच नाही तर विवेकानंद मांसाहारही करत असल्याचं थरुर यांनी म्हटलं असल्याचं भाजपच्या एका नेत्यानं सांगितलं.
देशाचे उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांच्या हस्ते गेल्या ११ सप्टेंबर रोजी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात मानव संसाधन विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी हे वक्तव्य केल्याचं कळतंय. भाजपचे नेता ओ. राजगोपाल यांनी थरूर यांनी आपलं वक्तव्य मागे घेवून देशातील जनतेची विनाशर्त क्षमा मागण्याची मागणी केली आहे.
केरळ भाजपचे अध्यक्ष व्ही. मुरलीधरन हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. थरूर यांनी जाहीर माफी न मागितल्यास पुढील कारवाईबाबत निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मुरलीधरन यांनी दिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close