शिवसेनेच्या भेटीनंतर जिल्हा बँकांना निधी मिळाला - संजय राऊत

शिवसेनेच्या खासदारांनी मोदींची भेट घेतल्यावर जिल्हा बँकांना निधी मिळाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय.. 

Updated: Nov 23, 2016, 04:18 PM IST
शिवसेनेच्या भेटीनंतर जिल्हा बँकांना निधी मिळाला - संजय राऊत title=

नवी दिल्ली : शिवसेनेच्या खासदारांनी मोदींची भेट घेतल्यावर जिल्हा बँकांना निधी मिळाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय.. 

शिवाय काल झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांविषयी आदरानं विधानं केली. वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर द्यायचं आहे...असं विधान उदात्त भावनेनं केल्याचं स्पष्टीकरण आज शिवसेनेनं दिलयं.  

मीडियानं विपर्यास करून बातम्या दिल्याचंही शिवसेनेनं म्हटलंय. शिवसेनेचे शत्रू अशी विपर्यासाची वाक्य पसरवित असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय. 

नोटाबंदीच्या मुद्द्यावर मोदींनी विश्वासात घेतलं असतं तर इतका गोंधळ माजला नसता असंही संजय राऊत यांनी म्हटलयं,. शिवाय भाजपचे लोकही नाराज आहेत पण ते उघडपणे बोलू शकत नाहीत असा खोचक टोमणाही राऊतांना लगावलाय.