गुलाम अलींना विरोध करायला गेलेली शिवसेना तोंडावर

मुंबईमधला पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करायला लावणाऱ्या शिवसेनेनं तिरुअनंतपुरममध्ये झालेला कार्यक्रम उधळण्याचाही प्रयत्न केला. पण, इथं मात्र सेनेला तोंडावर पडायला लागलं. 

Updated: Jan 15, 2016, 11:47 PM IST
गुलाम अलींना विरोध करायला गेलेली शिवसेना तोंडावर title=

तिरुअनंतपुरम : मुंबईमधला पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करायला लावणाऱ्या शिवसेनेनं तिरुअनंतपुरममध्ये झालेला कार्यक्रम उधळण्याचाही प्रयत्न केला. पण, इथं मात्र सेनेला तोंडावर पडायला लागलं. 

पोलिसांनी वेळीच घटनास्थळाचा ताबा घेतला. त्यामुळे सेनेला शांत बसावं लागलं. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या स्थळाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. गुलाम अलींनी पाकिस्तानला परत जावं, अशा घोषणाही त्यांनी दिल्या. त्यानंतरही गुलाम अलींचा इथंला नियोजित कार्यक्रम पार पडला.

गेल्या वर्षाच्या शेवटाला शिवसेनेच्या विरोधानंतर गुलाम अलींनी मुंबईतील आपला कार्यक्रम रद्ध केला होता व आपण मुंबईत पुन्हा कधीही येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसापुर्वी गुडगावमधील कार्यक्रमातही शिवसेनेने विरोध दर्शवला होता. मध्यंतरी लखनौत महोत्सवादरम्यान गायनाची तयारी दर्शविली असता तिथंही शिवसेनेने आपले विरोधाचे शस्त्र उगारलं होतं.