मोदी नाही, अडवाणीच व्हावे पंतप्रधान- शत्रुघ्न सिन्हा

शॉटगन अशी ओळख असलेले भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींऐवजी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तरफदारी केलीय.

जयवंत पाटील | Updated: Jul 23, 2013, 10:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी नरेंद्र मोदी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असतानाच, भाजपमधूनच त्यांच्या नावाला विरोध होतोय. शॉटगन अशी ओळख असलेले भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींऐवजी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तरफदारी केलीय.
मोदी हे लोकप्रिय आहेत, यात शंकाच नाही. उद्या भाजप संसदीय मंडळाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांना पुढे केले तर उत्तमच आहे. पण लालकृष्ण अडवाणी यांच्याकडेच सर्व सूत्रे असायला हवीत, असे मत बिहारी बाबूंनी व्यक्त केलंय. राजकारणात वाजपेयी हे पितृतुल्य आहेत आणि अडवाणी गॉडफादर आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
भाजपच्या निवडणूक प्रचार समितीवर नाराजी व्यक्त करतानाच, सुषमा स्वराज आणि यशवंत सिन्हा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.