काँग्रेस खासदाराविरोधातील तक्रार श्वेता मेननने घेतली मागे

कोल्लमचे काँग्रेस खासदार पितांबर कुरूप यांच्याविरोधातली तक्रार अभिनेत्री श्वेता मेनन हिनं मागे घेतलीये. ७१ वर्षांच्या कुरूप यांनी आपली माफी मागितल्यानंतर तक्रार मागे घेत असल्याचं तिनं पोलिसांना कळवलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 4, 2013, 06:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्लम
कोल्लमचे काँग्रेस खासदार पितांबर कुरूप यांच्याविरोधातली तक्रार अभिनेत्री श्वेता मेनन हिनं मागे घेतलीये. ७१ वर्षांच्या कुरूप यांनी आपली माफी मागितल्यानंतर तक्रार मागे घेत असल्याचं तिनं पोलिसांना कळवलंय. मात्र तिची FIR नोंदवली गेल्यामुळे तिचा पुन्हा एकदा जबाब नोंदवावा लागेल आणि कोर्टात जाऊन तक्रार मागे घ्यावी लागणार आहे.
प्रेसिडेंट ट्रॉफी नौका रेसिंग सोहळ्यात अभिनेत्री श्वेता मेननशी छेडछाड झाली होती. मीडिया फुटेजमध्ये खासदार एन. पितांबर कुरूप श्वेता मेननच्या जवळ सरकत गेलेले आणि तिला स्पर्श करत असल्याचं दिसलं होतं. एन. पितांबर यांनी मात्र हे संपूर्णपणे खोटं असल्याचं म्हटलं होतं.
“एक स्त्री म्हणून मला घडलेला प्रकार अत्यंत अपमानास्पद वाटतो. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.” असं श्वेता मेननने जाहीर केलं होतं. फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी तसंच महिला संघटनांनीही घडल्या प्रकाराचा निषेध केला आहे. खासदार एन. पितांबर कुरूप यांनी मात्र असं काहीच घडलं नसल्याचा दावा केला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.