सिद्दरामय्यांना आज मुख्यमंत्रीपदाची शपथ

आमदारांनी बहुमताने निवडलेले सिद्दरामय्या आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथ विधी परंपरेनुसार राजभवनाच्या ग्लास हाऊसमध्ये होणार नसून तो बंगळुरूतील कांतीवीरा स्टेडियमवर होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 13, 2013, 09:26 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
आमदारांनी बहुमताने निवडलेले सिद्दरामय्या आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथ विधी परंपरेनुसार राजभवनाच्या ग्लास हाऊसमध्ये होणार नसून तो बंगळुरूतील कांतीवीरा स्टेडियमवर होणार आहे.

ग्लास हाऊस मधील सुरक्षेच्या कारणास्तव अनेक लोकांना या कार्यक्रमात सहभागी होता येत नव्हते ही बाब टाळण्यासठी आणि हा कार्यक्रम भव्य प्रमाणात व्हावा म्हणून शपथविधीसाठी कांतीवीरा स्टेडीअमची निवड करण्यात आलीये.

राज्यपाल एच. आर. भारद्वाज सकाळी ११.५० वाजता सिद्दरामय्या यांना शपथ देतील. भाजपचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार
असलेल्या कर्नाटकातली सत्ता खेचून आणल्याने हा विजय लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी काँग्रेसने मुद्दामुन हा शपथविधी सोहळा सार्वजनिक ठिकाणी करण्याचं ठरवलंय. दरम्यान सिद्दरामय्या यांच्या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार हालचाली सुरू केल्यात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.