पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर म्हटलं गायत्री मंत्र

पाकिस्तानातून एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर गायत्री मंत्रांचा उच्चार केला गेला आहे. हा व्हिडिओ कराचीमध्ये होळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाचा आहे. जेथे पंतप्रधान नवाज शरीफ पाहुणे म्हणून आले होते.

Updated: Mar 17, 2017, 12:00 PM IST
पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर म्हटलं गायत्री मंत्र title=

नवी दिल्ली : पाकिस्तानातून एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर गायत्री मंत्रांचा उच्चार केला गेला आहे. हा व्हिडिओ कराचीमध्ये होळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाचा आहे. जेथे पंतप्रधान नवाज शरीफ पाहुणे म्हणून आले होते.

गायिका नरोदा मालिनी यांनी या दरम्यान गायत्री मंत्र म्हटलं. कराचीमध्ये होळीच्या निमित्त आयोजित या कार्यक्रमात नवाज शरीफ यांनी हॅपी होली म्हणत संबोधनाला सुरुवात केली.

नवाज शरीफ यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, 'पंतप्रधान म्हणून सर्व धर्माची सेवा करणे ही त्याची जबाबदारी आहे. अल्ला कोणत्याही शासकाला नाही विचारणार की, कोणत्याही एका धर्माच्या लोकांसाठी काय केलं. तो मला विचारेल की तू जगासाठी काय केलं. पाकिस्तान यासाठी नाही बनवला गेला की, एक धर्म दुसऱ्या धर्मावर कसा भारी पडेल. धर्म कोणालाही जबरदस्ती करत नाही. जबरदस्ती धर्मांतर करणं हा इस्लाममध्ये गुन्हा आहे.'

नवाज शरीफ पुढे म्हणतात की, 'आपल्याकडे काही लोकं पगडी घालतात, कोणी टाय लावतं, कोणी सूट घातलं पण आपण सगळे देवाची लेकरे आहोत. धर्माचं स्वतंत्र देवाने स्वत: आपल्याला दिलं आहे. आपण याला हिरावून घेणारे कोण आहोत.'