यूपी: शौचालय नसल्याने ६ नववधू माहेरी परतल्या

Last Updated: Monday, August 18, 2014 - 16:42
यूपी: शौचालय नसल्याने ६ नववधू माहेरी परतल्या

लखनऊ: उत्तर प्रदेशातील सहा नववधूंनी सासरी शौचालयाची सुविधान नसल्याने माहेरी जाणे पसंत केले. उघड्यावर शौचालयास जाण्यास त्यांचा विरोध होता. विशेष म्हणजे ६८ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात प्रत्येक घरात आणि विशेषतः ग्रामीण भागात शौचालय असावे, असे म्हटले होते. 

या नवविवाहितांनी मोदींच्या भाषणाकडे संकेत करत शौचालयाची सुविधान नसल्याने आपल्या पती आणि सासरच्या मंडळींचा विरोध केला होता. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील या नवविवाहित वधू लग्नाच्या काही आठवड्यानंतर माहेरी परतल्याचे एका स्वयंसेवी संस्थेने सांगितले.  

खेसिया गावांतील नीलम, कलावती, निरंजन, गुडिया आणि सीता यांना जेव्हा समजले की, त्यांच्या सासरी शौचालय नाही. तेव्हा त्यांनी विरोध केला.  

स्वस्त शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणारी स्वयंसेवी संस्था सुलभ इंटरनॅशनलने घोषणा केली की ते महिलांसाठी मोफत शौचालय बनविणार आहे. 

सुलभचे संस्थापक बिदेश्वर पाठक यांनी महिलांच्या या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे. हे पाऊल दमदार आणि असाधरण असून महिलांच्या बदलत्या मानसिकतेचे दर्शन घडवणारी आहे. 
विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी महाराजगंज येथील नववधू प्रियंका भारती हिने असे पाऊल उचलले होते त्यामुळे तिला सन्मानित करण्यात आले होते. या संदर्भात अभिनेत्री विद्या बालन हिनेही प्रियंका भारतीला घेऊन एक जाहिरात केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Monday, August 18, 2014 - 16:42
comments powered by Disqus