जेएनयूनंतर आता प्रेस क्लबमध्येही अफजल गुरुचा उदोउदो

जेएनयूमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता दिल्लीच्या प्रेस कल्बमध्ये अफजल गुरुचा उदोउदो करण्यात आला आहे. 

Updated: Feb 11, 2016, 06:16 PM IST
जेएनयूनंतर आता प्रेस क्लबमध्येही अफजल गुरुचा उदोउदो title=
सौजन्य: काश्मीरलाईफ.नेट

नवी दिल्ली: जेएनयूमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता दिल्लीच्या प्रेस कल्बमध्ये अफजल गुरुचा उदोउदो करण्यात आला आहे. 

संसद हल्ल्यात दोषी असलेला अफजल गुरु आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) सह-संस्थापक मकबूल भटच्या आठवणींसाठी नवी दिल्लीच्या प्रेस कल्बमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमाला दिल्लीतल्या 3 प्रमुख विद्यापीठांचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये हुरियतच्या सय्यद अली गिलानींनी फोनवरुन उपस्थितांशी संवाद साधला.

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अफजल गुरुनं काश्मिरच्या तरुणांना लिहीलेली पत्रही वाचण्यात आली. तसंच स्वतंत्र काश्मिरच्या घोषणाही या कार्यक्रमामध्ये देण्यात आल्या. त्यामुळे या कार्यक्रमावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे.