काश्मीर, झारखंडमध्ये मतदानाला सुरुवात

जम्मू काश्मीर आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. काश्मीरमधील १५ आणि झारखंडमधील १३ मतदारसंघात हे मतदान होत आहे.

PTI | Updated: Nov 25, 2014, 11:49 AM IST
काश्मीर, झारखंडमध्ये मतदानाला सुरुवात title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. काश्मीरमधील १५ आणि झारखंडमधील १३ मतदारसंघात हे मतदान होत आहे.

काश्मीरमधील या पहिल्या टप्प्यात १२३ उमेदवार रिंगणात आहेत. १५ मतदारसंघांपैकी जम्मू विभागात सहा, काश्‍मीर खोऱ्यातील पाच आणि लडाखमधील चार मतदारसंघ आहेत. पहिल्या या टप्प्यात ३४४१ काश्‍मिरी पंडित मतदानाचा हक्क बजावतील.

झारखंड भाग नक्षलग्रस्त असल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या मतदारसंघांमध्ये एकूण १९९ उमेदवार आपले भविष्य आजमावणार आहेत. एकूण ३९०० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. एकूण ३३६१९३८ मतदार मतनाचा हक्क बजावत आहेत . राज्यात कॉंग्रेस आणि संयुक्त जनता दलासोबत आघाडी करत राष्ट्रीय जनता दलानेही आपले उमेदवार उभे केले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.