‘येलमधून डिग्री’ ट्विटरवर स्मृती इराणीवर जोक्स

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या वादाला एक नवीन वळण प्राप्त झाले आहे. स्मृती इराणी यांनी दावा केला की त्यांच्याकडे अमेरिकेची प्रतिष्ठीत येल विद्यापीठाची डिग्री आहे. ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरून जोक्स शेअर करणे सुरू झाले आहे. 

Updated: Aug 11, 2014, 02:11 PM IST
‘येलमधून डिग्री’ ट्विटरवर स्मृती इराणीवर जोक्स title=

नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या वादाला एक नवीन वळण प्राप्त झाले आहे. स्मृती इराणी यांनी दावा केला की त्यांच्याकडे अमेरिकेची प्रतिष्ठीत येल विद्यापीठाची डिग्री आहे. ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर स्मृती इराणी यांच्या डिग्रीवरून जोक्स शेअर करणे सुरू झाले आहे. 

जेव्हापासून स्मृती इराणी यांनी सांगितले की, त्यांच्याकडे येल विद्यापीठाची डिग्री आहे, तेव्हापासून Yale आणि Smriti Irani ट्रेंड करत आहे.

 

 

स्मृति इराणींच्या डिग्रीवरून लोकांनी खूप मस्करी सुरू केली आहे. पाहू या काही ट्विट ज्यात स्मृती इराणींची खिल्ली उडवली आहे. इराणी ज्या येल विद्यापीठाच्या कोर्सबद्दल बोलत आहे. तो ६ दिवसांचा क्रॅश कोर्स होता. यात सामील होण्यासाठी गेल्या महिन्यात स्मृती इराणींसह ११ खासदार अमेरिकेला गेले होते. 

१६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकालानंतर लगेच इराणी यांच्या शैक्षणिक पात्रता वादाच्या भोवऱ्यात आली होती. 
 
स्मृती इराणी यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की, लोक मला अशिक्षित मानतात, पण माझ्याकडे येल विद्यापीठाची डिग्री आहे, ती मी दाखवू शकते आणि सांगू शकते की येल विद्यापीठाने माझ्यातील नेतृत्व क्षमतेचा उत्सव साजरा केला.  

यासोबत स्मृती इराणी सोशल नेटवर्किंग साइट फेसबूकवरही ट्रेंड करीत आहे. तसेच मस्करीच्या अंदाजात त्यांचे फोटो पोस्ट केले जात आहे तसेच शेअर केले जात आहे.