गाझियाबादच्या हिंडन एअरबेसमध्ये संशयित घुसल्याची शक्यता

उत्तर प्रदेशमधील गाझियाबादच्या हिंडन एअरबेसमध्ये काही संशयित घुसल्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हिंडन एअरबेसचे सर्व गेट्स बंद करण्यात आलेत. तसंच एअरबेसवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीये. 

Updated: May 6, 2016, 11:43 AM IST
गाझियाबादच्या हिंडन एअरबेसमध्ये संशयित घुसल्याची शक्यता title=

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादच्या हिंडन एअरबेसमध्ये काही संशयित घुसल्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हिंडन एअरबेसचे सर्व गेट्स बंद करण्यात आलेत. तसंच एअरबेसवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीये. 

एअरबेसमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सरु आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते रात्रीच्या वेळी काही संशयितांनी एअरबेसमध्ये प्रवेश केलाय. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनूसार या एअरबेसवर हल्ला करण्यासाठी काही संशयितांनी लोनी आणि आसपासच्या परिसरात वास्तव्य केलं होतं. त्यांनी या भागाची रेकीसुद्धा केली होती. 

दहशतवादी या एअरबेसला लक्ष बनवणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यामुळे या एअरबेसच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.. मात्र तरीही हे संशयित एअरबेसमध्ये कसे घुसले असा सवालही उपस्थीत होतोय.