अॅसिड हल्ला पिडीत सोनालीला मिळाला इंजिनिअर जोडीदार

अॅसिड हल्ल्यातील पिडीत सोनाली. चेहरा विद्रुप झाल्याने तिने लग्न नकरण्याचा निर्णय घेतला खरा. पण   तिला तो विचार बदलण्यास एका तरुणाने  भाग पाडलं. नियतीवर मात केलेल्या या तरुणीला जीवनभराचा जोडीदार मिळाला.

Updated: Apr 24, 2015, 06:30 PM IST
अॅसिड हल्ला पिडीत सोनालीला मिळाला इंजिनिअर जोडीदार title=

रांची : अॅसिड हल्ल्यातील पिडीत सोनाली. चेहरा विद्रुप झाल्याने तिने लग्न नकरण्याचा निर्णय घेतला खरा. पण   तिला तो विचार बदलण्यास एका तरुणाने  भाग पाडलं. नियतीवर मात केलेल्या या तरुणीला जीवनभराचा जोडीदार मिळाला.

अॅसिड हल्ला. कोण करणार हिच्याशी लग्न, असा विचार अनेकांच्या मनात आला असेल. मात्र असा निर्णय घेण्यासाठी उडिसा येथील इंजिनिअर असलेल्या चितरंजन तिवारीला कोणताही त्रास झाला नाही. त्याने ओडीशासातील एका अॅसिड हल्ला पिडीत सोनाली मुखर्जीसोबत विवाह केला आहे.

२००३ मध्ये सोनालीवर अॅसिड हल्ला झाला होता. त्यात ती ७०  टक्के भाजली होती. तिच्या चेहऱ्यावर आतापर्यंत ३० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

अॅसिड हल्ल्यानंतर सोनालीने कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र चितरंजनला भेटल्यानंतर तिने हा निर्णय बदलला आहे. ९ महिन्यांपूर्वी झालेल्या मैत्रीचे रुपांतर लग्नात करण्याचा त्यांनी घेतला.

अॅसिड हल्ल्यानंतर सोनाली एका 'क्राईम शो' आणि एका 'रिअॅलिटी शो'मध्ये आली होती. त्यातून ती घराघरात पोहोचली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.