सोनिया गांधी `चेटकीण`?

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, January 6, 2013 - 18:39

www.24taas.com, नवी दिल्ली
भारत आणि इंडिया यांच्यात फरक असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विधान केल्यावर युवा मोर्चाचे अनुराग ठाकूर यांनी भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन करत इंडियाच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इंडियाबद्दल बोलताना त्यांनी सोनिया गांधी यांचा अप्रत्यक्षरीत्या चेटकीण संबोधलं आहे.
अनुराग ठाकूर यांनी फेसबुकवरून ‘इंडिया विरुद्ध भारत’ फरक स्पष्ट करताना इंडियाबद्दल असं लिहीलं आहे की इंडिया असं ठिकाण आहे जिथे मोठमोठे नेते एका चेटकिणीच्या हातातल्या बाहुल्या बनल्या आहेत. यामध्ये चेटकीण म्हणत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तर मोठ्या नेत्यांना कठपुतळ्या म्हटलं आहे.
याशिवाय त्यांनी इंडियाबद्दल दाखले देताना लिहिलं आहे, की ‘इंडियामध्ये डर्टी पिक्चर सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो. इंडियामध्ये मीडिया पॉर्न स्टार सनी लिऑनचा वाढदिवस साजरा करतो. इंडिया मध्ये पूनम पांडे निर्लज्जपणे सर्वांसमोर स्वतःचे कपडे उतरवण्याची विधानं करते. इंडिया असं ठिकाण आहे जिथे शर्लिन चोप्रा प्लेबॉय मसिकासाठी नग्न फोटो काढते आणि आपल्या वडिलांना हे फोटो पाहून अभिमान वाटेल, असं बरळते. इंडिया असं ठिकाण आहे जिथे आपल्या मुलीशी सेक्स करण्याबद्दल महेश भट्ट खुलेआम बोलतो.‘

First Published: Sunday, January 6, 2013 - 18:39
comments powered by Disqus